Ad will apear here
Next
बुद्धिबळ स्पर्धेला चांगला प्रतिसाद
प्रातिनिधिक फोटोसांगली : नूतन बुद्धिबळ मंडळातर्फे आयोजित सुवर्णमहोत्सवी बाबूकाका शिरगावकर स्मृती फिडे मानांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत देशभरातील २३५ बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत. बांधकाम व्यावसायिक एम. व्ही. कुलकर्णी, सुधा कुलकर्णी, व्यापारी प्रवीण शहा यांनी पटावरील चाल खेळून या स्पर्धेचे उद्घाटन केले. 

स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, गोवा, तामिळनाडू, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांमधून बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत. कस्टम विभागाचा आंतरराष्ट्रीय मास्टर अभिषेक केळकर, रेल्वेचा समीर कठमाळे, तामिळनाडूचा आर. बालसुब्रह्मण्यम, तामिळनाडूचा राजेश व्ही. ए. व्ही, रेल्वेचा एस. रवि. तेजा, फिडेमास्टर सौरभ खर्डेकर, मुंबईचा राकेश कुलकर्णी, पुण्याचा अनिरुद्ध देशपांडे, कोल्हापूरचा सम्मेद शेटे, पुण्याचा चिन्मय कुलकर्णी, नाशिकचा सुयोग वाघ, अहमदनगरचा संकर्षा शेळके, पुण्याचा सोहन फडके, पुण्याचा निखील दीक्षित, रेल्वेचा अमरदीप बारटक्के, कोल्हापूरचा अनिश गांधी, पुण्याचा प्रतीक मुळे, पृथु देशपांडे, राजस्थानचे ज्योतिप्रकाश शर्मा, गोविंद प्रसाद, सांगलीचे विजयकुमार माने, सदानंद चोथे, मुंबईचा चिराग सत्कार या नामांकितांसह १८० बुद्धिबळपटूंचा समावेश आहे. नितीन शेणवी, विवेक सोहनी, जयश्री पाटील, सूर्याजी भोसले, दीपक वायचळ हे पंच म्हणून काम पाहात आहेत. 

अंध बुद्धिबळपटूचा सहभाग 

ठाणे येथील आर्यन बी. जोशी हा अंध बुद्धिबळपटू स्पर्धेत खेळत आहे. स्पर्श ओळखून खेळण्याची त्याची पद्धत आहे. त्यामुळे त्याच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZSABC
Similar Posts
राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादची ऋतुजा बक्षी विजेती पुणे : अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेच्या वतीने, पुणे जिल्हा बुद्धिबळ  संघटनेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय मानांकन खुला गट राज्य निवड चाचणी फिडे रेटिंग स्पर्धा नुकतीच पुण्यात पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून २३३ खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत औरंगाबादची ऋतुजा बक्षी प्रथम क्रमांकाची विजेती ठरली
वाचन कट्टा उपक्रमाचे उद्घाटन भिलवडी (सांगली): येथील बाबासाहेब चितळे महाविदयालयात २२ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता वाचन कट्टा उपक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी  ग्रंथपाल डॉ .विकास खराडे यांनी स्वागत, प्रस्ताविक केले. डॉ. एस. बी. चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले, तर डॉ. गाडे यांनी आभार मानले
चौसष्ठ घरांचा नवा राजा ग्रँडमास्टर होण्याचे स्वप्न बुद्धिबळातला प्रत्येक खेळाडू पाहतो; मात्र त्यात खूप कमी जण यशस्वी होताना दिसतात. पुण्याचा अभिमन्यू पुराणिक याने आपले हे स्वप्न पूर्ण करून महाराष्ट्राचा सातवा, तर पुण्याचा तिसरा ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान मिळवला... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या बुद्धिबळपटू अभिमन्यू पुराणिकबद्दल
मोबाइल ॲपद्वारे होणार पशुधनाच्या नोंदी मुंबई : राज्यातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये एक हजार २८४ राहत शिबिरे आणि छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मोठे मिळून आठ लाख ५५ हजार ५१३ पशूधन दाखल झाले आहेत. पुणे, सातारा, सांगली आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांमध्ये

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language